सुधीर मुनगंटीवार यांची माहाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदी नियुक्ती...कोपना येथे जल्लोष करून,फटाके,फोडून पेढे वाटून,ढोल ताशाच्या गजरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला.....
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात विजयोत्सव साजरा करताना प्रमुख उपस्थिती किशोरजी बावणे सहकार आघाडी प्रमुख, पुरुषोत्तमजी भोंगळे तालुका उपाध्यक्ष, संजय मुसळे माजी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष, रमेश पा मालेकर, कवडू पा जरिले, विलास पारखी, अनिल कौरासे शाखाध्यक्ष कोरपणा, सुभाष हरबडे नगरसेवक कोरपना, प्रमोद गिरडकर तालुका प्रतिनिधी, मनोज गोरे पत्रकार, मेघराज हरबडे, सुमित वैरागडे, झाडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते,
नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात माननीय सुधीर मुनगंटीवार यांची तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले व महाराष्ट्राचा चांगल्या प्रकारे विकास होईल व सोबतच चंद्रपूर जिल्ह्याचा सुद्धा अडीच वर्षे थांबलेला विकास पुढे चालू राहील या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले विजय उत्सवात तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम भोंगळे यांनी केले तर आभार सुभाष हरबडे यांनी मानले.
