जे के ट्रान्सपोर्टच्या MH34-M8140 ने दिली बैलाला धडक
शिवसेना नेते बबन उरकुडे यांच्या मध्यस्थीने बैलमालकाला 40000 रुपयाची मदत
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
गोवरी येथील शेतकरी सुधाकर परसूतकर यांनी आपला बैल शनिवार बाजार राजुरा येथे विक्रीकरिता आणताना रामपूर जवळ जे के ट्रान्सपोर्टच्या MH34-M8140 ने जोरदार धडक दिली. या घटनेत बैल बेकामी झाले असून पूर्णपणे अपंग झालेला आहे.
जडवाहतुकीसाठी हा रस्ता नसूनसुद्धा या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघात वाढत चालले आहे.
घटनेची माहिती मिडताच शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला आणि ट्रान्सपोर्टमालकाशी संपर्क करून पीडित शेतकऱ्याला 40000 रुपयाची रोख मदत मिळवून दिली.
याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुकाप्रमुख बंटी मालेकर, विनोद परसूतकर आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

