अपघातात अपंगत्व आलेल्या अडेगाव येथील शेतकऱ्यांसाठी मंगेश पाचभाई आले धावून
मिळवून दिला एक लाख शेतकरी अपघात विमा
सोबतच केले अनेक योजनेसाठी सहकार्य
विदर्भ माझा न्युज 24 - अडेगाव
अडेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी नामे मधुकर कोगरे हे आपल्या नातेवाईकांना भेटायला जात असताना नारडा येथे त्याचा दुचाकी ने अपघात झाला अपघात एवढा जबरदस्त होता की त्यांना नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले त्यांना पायाला जबर मार लागल्याने त्याचा एक पाय कापावा लागला
त्यांना कायमचे अपंगत्व आले शेतकरी असलेलं कोगरे आधी कर्ज बाजरी,नापिकी त्रस्त त्यात झालेला अपघात या सर्व गोष्टींतुन आर्थिक अडचणीतून बाहेर निघणे कठीण असताना युवा नेते मंगेश पाचभाई यांनी त्यांच्या घरी जाऊन योजनेची माहिती दिली,पोलिसात तक्रार दाखल करून संपूर्ण कागदपत्रे तयार करून गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत एक लक्ष रुपये मधूकर कोगरे याच्या खात्यात जमा झाले शासनाकडून वेळो वेळो पाठपुरावा करून मिळवून दिली,सोबतच अपघात गेलेला पाय सुद्धा कॅम्प च्या माध्यमातून कृत्रिम पाय बसण्यासाठी मदत केली,अपंग निराधार योजनेचा सुद्धा लाभ युवा नेते मंगेश पाचभाई त्या अपंगत्व आलेल्या शेतकरी मधुकर कोगरे याना मिळवून दिल्याने कोगरे परिवाराने मंगेश पाचभाई यांचे आभार मानले.
