Top News

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या विदर्भ प्रदेश सचिव पदी राहुल खारकर यांची नियुक्ती.....

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या विदर्भ प्रदेश सचिव पदी राहुल खारकर यांची  नियुक्ती.....





विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ



विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक दिनांक 19 एप्रिल रोज शनिवार ला नागपूर येथील मुख्यालयात पार पडली.या बैठकीत युवा आघाडी विदर्भ प्रमुख मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात विदर्भवादी नेते वामनराव यांच्या मार्गदर्शनात तर देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा किसान ब्रिगेड चे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्या हस्ते राहुल खारकर यांची विदर्भ प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. 

विदर्भ आंदोलनात राहुल खारकर यांचा प्रवास 2014 पासून सुरू झाला सर्व प्रथम ते विदर्भवादी म्हणून विविध आंदोलनात होते नंतर ते काही वर्षे वणी तालुका अध्यक्ष तर यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी ते सलग 4 वर्ष होते.आता त्यांची युवा आघाडी विदर्भ प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.त्यांनी विदर्भाचे राज्य झाल्याखेरीज आंदोलन थांबणार नाही असा या बैठकीत निर्धार व्यक्त केला.

यावेळी या बैठकीला उपस्थित वामनराव चटप,प्रकाश पोहरे,अविनाश काकडे,अरुण केदार,प्रभाकर कोंबतुवार, प्रा.पुरुषोत्तम पाटील,मुकेश मासुरकर,सुनील वडसकर यांच्यासह या बैठकीला विदर्भवादी उपस्थित होते.

Previous Post Next Post