Top News

पत्नीची हत्या करून पतीने केले आष्टी पोलीसांसमोर आत्मसमर्पन..........

पत्नीची हत्या करून पतीने केले आष्टी पोलीसांसमोर आत्मसमर्पन..........


पतीने पत्नीच्या डोक्यावर वार करून केली तिची हत्या........


विदर्भ माझा न्युज 24 - आष्टी



प्रेमविवाह झालेल्या पती-पत्नीत घरगुती वाद होऊन पतीने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवार दिनांक 24 एप्रिल 2022 रोजी सकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे घडली आहे. या घटनेमुळे आष्टी शहरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की विद्या देविदास चौथाले वय 24 वर्षे राहणार आष्टी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून देविदास पुंजाराम चौथाले वय 30 वर्षे राहणार आष्टी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे आरोपी पतीचे नाव आहे.

  आष्टी येथील रहिवासी देविदास चौथाले याचा आंतरजातीय विवाह 2 वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील विद्या नरोटे या तरुणीशी झाला. पती-पत्नीच्या भांडणात ही हत्या झाल्याचे बोलल्या जात आहे. 

आरोपीने पत्नीच्या डोक्यात राडने मारून तिची हत्या केली व स्वतः आष्टी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून घटनास्थळ गाठले आहे.

 पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात उपपोलीस निरीक्षक गणेश जंगले यांच्या तपासणी पथकाकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे आष्टी शहरच नव्हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Previous Post Next Post