वारंवार लाईट जात असल्यामुळे मारोडा सर्कल चे नागरीक त्रस्त...
दोन ते तिन दिवसांत लाईट दुरस्तीचे सहाय्यक अभियंता यांनी दीले आश्वासन...
विदर्भ माझा न्युज 24 -
मारोडा या गावातील व या सर्कल मध्ये येणारे इतर खेडे पावसामुळे गावातील लाईन वारंवार जात असल्यामुळे येथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील लाईन रात्री बे रात्री जात असल्यामुळे तेथील नागरीकांना गर्मी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. मारोडा गावातील सरपंच भिकारुजी शेंडे, उपसरपंच अनुप नेरलवार व भा दूर्णी येथील माजी उपसरपंच संतोष रेगुंडवार यांनी गावातील लोकांची समस्या जाणून तसेच पुढाकार घेऊन गावाचा हितासाठी मुल येथील वीज वितरण कंपनी मुल शहर येथील उपसहाय्यक अभियंता उजवण यांना निवेदन दीले. उप सहाय्यक अभियंता यांनी दोन ते तीन दिवसात गावातील लाईट पूर्णपणे दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

