Top News

Success_to_the_students'_endeavors!

शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाला यश !




विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड(चंद्रपूर)

गेल्या दोन वर्षा पासुन covid-19 ची परिस्तिथी उभारली असून अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत , अनेक जणांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठाने कुठल्या प्रकारचा विचार न करता सर्व शुल्क भरावे अश्या सूचना दिले , विध्यार्थी व पालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास झाल्या मुळे काही विध्यार्थी संघटना एकत्र येऊ तसेस काही शिक्षण घेणारे विध्यार्थी  यांनी मान. उदय सामंत साहेब ( उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ) यांच्या कडे तब्बल दोन ते तीन वेळा निवेदन दिले या बाबत महत्वाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी करण्यात आली अन्यथा विध्यार्थी मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारतील असे सुद्धा शब्द दिले  तरी मंत्री साहेबांनी यावर योग्य तो निर्णय देऊ आणि तो निर्णय विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचा असणार असे आश्वासन दिले . शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील प्रसाद अक्कपेलीवार , अक्षय खनके , ललित आत्राम , चंचल मून , प्रियांशु सोमकुवार व इत्यादी विद्यार्थ्यांनी मंत्री साहेबयांच्या  सोबत भेट घेऊन चर्चा केली , आज दि २९-०३-२१ रोजी मंत्री महोदयच्या बैठकीत विद्यालय शुल्क व परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे हे निर्णय दिले .

Previous Post Next Post