Top News

Good_news_for_wine_lovers_many_people_will_have_now_employment_opportunities?

मद्य प्रेमींसाठी आनंदाची बातमी...अनेकांना आता रोजगाराच्या संधी..?


चंद्रपुर जिल्हातील दारु दुकाने १ जुलै पासुन सुरु.....



विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)

राज्य सरकारने चंद्रपूर जिल्हाची दारूबंदी उठविल्यानंतर प्रत्यक्षात दारूविक्री कधी सुरू होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले असता दारू विक्रेते आणी दारू पीणार्यांसाठी आता प्रशासकीय पातळी वरून "गुड न्युज" आली आहे दोन दिवसांत जवळपास ८० अनुज्ञप्तींना मंजुरी दीली जानार असून १ जुलै पासुन प्रत्यक्ष दारू विक्री सुरु होणार आहे. 

जिल्हात सिएल २(देशी दारू घाऊक विक्री दुकाने)-५, सिएल-३(देशी दारु कीरकोळ दुकाने)११०, सिएल/बिआर(सिएल ३ मधुन बियर विक्री )-२५, एफएल १ (विदेशी दारू घाऊक विक्री दुकाने)-३, एफएल २(विदेशी दारू कीरकोळ विक्री/वाईन‌ शाॅप)-२४, एफएल ३(बार/परमीट रुम)-३१३, एफएल ४ (क्लब) -२,  एफएल बिआर २ (बियर शाॅपी)-५०, एफएल २ (मिलीट्री वेंडर्स लाईसन्स)-२,एसडब्लु १ (सेन्क्रींमेंटल वाईन)-१, टीडी १ (ताडी विक्री)-८, डीएस ५(डिनेचर्स स्पीरीट इंडस्ट्री-ओडीएस)-४, डिएस ७ (स्पेशल डीनेचर्स स्पीरीट)-३, आरएस २ (मद्यार्क स्पीरीट-५ लाखांच्या आत)-४, एमएफ २ (मोहफुर कीरकोळ विक्री)-५, पाॅपी २ (अफुची बोंबे कीरकोळ विक्री)-२ अशी एकुन ५६१ अबकारी अनुज्ञप्तींना एप्रील २०१५ पुर्वी   परवानगी होती दारुबंदीच्या निर्णयानंतर हे सर्व परवाने संपुष्टात आले. आता दारुबंदी उठल्याने नव्याने या सर्व दुकानदारांना परवान्याचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे,२५ जुन पर्यंत २१६ अनुज्ञप्तीधारकांनी नुतणीकरणा करीता अर्ज केले आहे,त्या पैकी १२४ अर्जांची पळताळनी करण्यात आली,काही ठीकानी मौका चौकशी सुद्धा करण्यात आली आहे, मौका चौकशी करतांना काही बाबी उघळकीस आल्या आहे,अनेक दारु दुकानाच्या जागा भाड्याने घेतलेल्या आहेत,दारु दुकानदार भाडे देत नाही अशी अनेकांची तक्रार आहे,काही दुकानदारांनी आता परवाने संपुष्टात आल्यानंतर जागा विकल्या, महीलांना त्रास होईल अश्याठीकानी दारु दुकाने सुरु करण्यात येऊ नये अश्या तक्रारी आहेत. जुणी दुकाने ज्या ठीकानी होती त्याच ठीकानी नव्याने सुरु केली जानार असेल तर फार अडचन नाही पण, दुकाने स्थलांतरीत असतील तर शासनाच्या नियमानुसार परवानगी दिली जानार आहे, एक खीडकी योजव्दारा तिन ठीकाना हुन अर्ज घेण्यात आले.

मौका चौकशी आणी पळताळनी केलेल्या अर्जांना मान्यता देण्यात यावी या साठी उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधीकारी कार्यालयाकडे परवानगी साठी फाईल पाठवीली त्याला जिल्हाधीकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी मान्यता दीली. मंगळवार आणी बुधवार या दोन दिवसांत जवळपास ८० परवाने मंजुर केले जानार आहे, मंजुरी नंतर ही दुकाने कधीही सुरु करता येतील.त्या मुळे प्रत्यक्षात दारु विक्रीचा मुहुर्त १ जुलै ठरला असल्याचे आता स्पष्ट दिसु लागले आहे. 

तर आता दारू बंदी नंतर ज्या छोट्या व्यैवसाईकांचे कामे बंद झाली,वेटर,बार मध्ये काम करणारे अनेक कामगार,दारु दुकांना समोर हात बंडी लाऊन  चकना(condiment)विकुन आपले उदरनीरवाह करणार्यांना आता परत रोजगाराची संधी मिळनार आहे त्या मुळे आता मध्य प्रेमींसह अनेकांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्मान झाले आहे.

Previous Post Next Post