Top News

Central_BJP_government_should_give_independent_state _of_Vidarbha_or_else_leave_Vidarbha

 

केंद्राच्या भाजपा सरकारने  "विदर्भ द्यावा अन्यथा विदर्भ सोडावा "

विदर्भ राज्य आंदोलन समिती उतरनार निवडणुकीच्या रिंगनात....


कार्यकारणी बैठकीत झाला निर्णय....


नागपूर येथील शाहिद चौक  येथे वीज व स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिवसापासुन बेमुदत ठिय्या आंदोलन....




विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर

काल पार पडलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या  विदर्भ स्तरीय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत खालील प्रमाणे निर्णय देण्यात आले व तसेच ठराव मंजूर करण्यात आले 


. १. स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा कारण भाजपने भुवनेश्वर ला विदर्भाचा ठराव करून अटलजींनी तीन नवीन राज्ये केली परंतु विदर्भ दिला नाही . तेव्हा हि विदर्भावर अन्याय केला २०१४ च्या निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी सह सर्व नेत्यांनी आश्वासन देऊन वेगळा विदर्भ करू असे म्हणाले परंतु विदर्भ दिला  नाही सर्व नेते विदर्भाच्या जनतेशी खोटे बोलले आतापर्यंत यांची आम्ही वाट बघितली या सर्वांचा निषेध करून .  आता ९ ऑगस्ट क्रांती दिवसापासून विदर्भ राज्य आंदोलन समितीने आरपार लढाई चा निर्णय घेतला आहे . ९ ऑगस्ट ला  संपूर्ण विदर्भातून हजारो कार्यकर्ते नागपूरला येतील विदर्भ चंडिका देवीला साकडे घालून महाआरती करणार व शाहिद चौक इतवारी नागपूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाची सुरवात होईल . भाजपच्या केंद्र सरकारला विदर्भवादि सांगणार आहे .  केंद्राच्या भाजपा सरकारने विदर्भ द्यावा  अन्यथा "विदर्भातून चालते व्हा , चले जावं "  "विदर्भ द्या अन्यथा विदर्भ सोडा " बेमुदत ठिय्या आंदोलनाला हजारो विदर्भवादी संपूर्ण विदर्भातून येतील त्याची तैयारी करण्यासाठी संपूर्ण विदर्भात तालुका, जिल्ह्यात बैठक सभा  घेऊन प्रचार करण्याचे कालच्या बैठकीत ठरले  


२. नागपूर महानगर पालिकेच्या निवडणूका ६ महिन्यांनी होणार आहे . नागपूर महानगर पालिकेत प्रचंड भ्रष्टाचार बोकायला आहे , तेथे जनतेचे काम होतच नाही महापालिकेचे दिवाळे निघाले आहे , जनता भाजपा पासून त्रस्त आहे अश्यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती ने हि निवडणूक लढवून जनतेला दिलासा देण्यासाठी , जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी , भ्रष्ट सत्ता संपविण्यासाठी ह्या निवडणूक लढवायला पाहिजे अशी मागणी लावून धरली व कालच्या बैठकीत नागपूर महानगर पालिकाची  लढण्याची परवानगी देण्यात आली असा निर्णय घेण्यात आला व नागपूर शहर समितीने कसे लढावे किती जागा लढाव्या आदी सर्व ठरवावे असे ठरले  . 

३. नवी मुंबई येथील विमानतळाला स्व. वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री हे विदर्भ पुत्र आहे व नवी मुंबई हि वसंतराव नाईक यांनी वसविली आहे म्हणून बऱ्याच लोकांनी त्यांचे नाव द्या अशी मागणी केली आहे . त्या मागणीला विदर्भ राज्य आंदोलन समितीने आजच्या बैठकीत पाठिंबा दिला व वसंतराव नाईक  यांचे नाव विमानतळाला द्यावे असा ठराव संमत केला. 

४. कोरोना महामारीमुळे उद्योग , व्यापार व्यवसाय बंद असल्यामुळे लोक बेरोजगार झाले आहे व त्यांची क्रयशक्ती संपली आहे म्हणून कोरोना काळातील वीज बिल सरकारने भरावे , २०० युनिट वीज फ्री द्या व नंतरची युनिट दर निम्मे करा त्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आरपार ची लढाई लढणार आहे . वीज बिल भरा अन्यथा कनेक्शन कापू अशी धमकी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली .  त्यांचा व महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्याचा ठराव केला असून येत्या निवडणुकीत जनता या महाआघाडी सरकार ला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे ठरले . 

कालच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट वामनराव चटप , मुख्य संयोजक राम नेवले , महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे , युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासूरकर यांनी मार्गदर्शन केले . बैठकीला अरुण केदार , तात्यासाहेब मते , प्रभाकर कोंडबातूनवार , रमेश राजूरकर , विष्णूजी आष्टीकर , सुयोग निलदावार , सुरेश जोगळे , सम्राट डोंगरदिवे , सुनीता येरणे , रेखा निमजे , ज्योती खांडेकर , विना भोयर , राजेंद्र आगरकर , प्रकाश लढ्ढा , मनीषा फुंडे , शरद जिचकार , बसंतकुमार चौरसिया , प्रशांत जयकुमार , राजेंद्र सतई , मितीन भागवत , कपिल इद्दे  ,  सुदाम राठोड , देविदास लांजेवार , दामोधर शर्मा , गुलाबराव धांडे , अरविंद तायडे , प्रशांत तिजारे , नंदकिशोर बोदरे , अजय शाहू , सागर सोनकुसरे , सह आदी १०० हुन जास्त पदाधिकारी विदर्भातून उपस्थित होते. 





Previous Post Next Post