तालुक्यात शौचालय बांधकामाचा फज्जा...
झालेल्या कामांची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी...
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) धनपालसिंग वधावन,गडचांदूर :-
कोरपना पंचायत समिती अंतर्गत सन 2019-20 मध्ये शासनाद्वारे 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत बेलगाव, चिंचोली, पाखडहिरा या गावातील 145 आदिवासी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या प्रशासनाने बेळगाव ग्रामपंचायतीला निधीही उपलब्ध करून दिला होता. असे असताना देखील लाभार्थ्यांचे बनावटी कागदपत्र, संमती-पत्र तयार करून एन.एल.बी. तयार करून लाभार्थी यादी मंजूर करण्यात आली. याबाबत लाभार्थ्यांना जाणीव करून देण्यात आली नाही. परस्पर सरपंच, उपसरपंच, सचिव व ठेकेदार यांनी संगणमत करून 145 पैकी अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम होण्यापूर्वीच लाभार्थ्यांच्या निधी उचल करत लाभार्थ्यांची फसवणूक केली व शासनाच्या उद्देशाला काळे फासण्यात आले. सदर बांधकाम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे करून शासनाच्या निधी फक्त करण्यात आला. यामुळे बेळगाव ग्रामपंचायतीच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकामा पासून अनेक लाभार्थी वंचित असल्याची तक्रार पंस कोरपना चे गट विकास अधिकारी पाटील यांची भेट करण्यात आली. ग्रामस्थांनी बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी गेल्या तीन वर्षांपासून पेसा निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप करत सरपंच, सचिव व संबंधित कर्मचारी यांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यावेळी ग्रामस्थांसोबत गजानन जुमनाके, माणिक सिडाम, रामदास पेंदोर, सिताराम आडे, संगीता जुमनाके उपस्थित होते.
