Top News

राजुरा येथे माणुसकीच्या भिंतीचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन.

 राजुरा येथे माणुसकीच्या भिंतीचे  नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन.



( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी )  धनपालसिंग वधावन,राजुरा :-

नगर परिषद राजूरा ने गरजू लोकांकरिता 'नेकी की दीवार'  नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे यांच्या हस्ते "माणुसकीची भिंत" चे उद्घाटन करण्यात आली. (माणुसकीची भिंत)हा  एक आगळा वेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम चालू केले आहे . राजुरा जिल्हा परिषद हायस्कुल शाळेसमोर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी एक सुंदर प्लॅटफॉर्म माणुसकीचा भिंत तयार करण्यात आली आहे.

ज्यांना आपल्या घरातील निकामी वस्तू ,कपडे अन्य जीवन उपयोग साहित्य निकामी असल्यास त्यांनी माणुसकीच्या भिंतीवर आणून ठेवावे. जेणेकरून ते गरीब किंवा गरजू लोकांना याचा नक्की फायदा होईल.

याला एक हात मदतीचा असे म्हणायला काही हरकत नाही.अशा या नेकी की दीवार (माणुसकीचा भिंत )चे उदघाटन प्रसंगी सूनिल देशपांडे उपनगराध्यक्ष .विशेष उपस्थिती  अर्शिया जुही  मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा . आनंद दासरी आरोग्य सभापती,  हरजितसिंग संधू बांधकाम सभापती.  गजानन भठारकर सभापती व सर्व नगरपरिषद कर्मचारी .पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. गरीब गरजू लोकांपर्यंत निकामी असलेले साहित्य कपडे व इतर वस्तूंची उपलब्धता होईल. एक माणुसकी चांगला संदेश समाजातील प्रत्येकाला जाईल व सर्वांना पुण्याचे छोटासा हिस्सेदार बनता येईल. अश्या प्रकार च्या उपक्रमाबद्दल सर्व जनता नगरपरिषद चे कौतुक करीत आहे.

Previous Post Next Post