Top News

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढकार नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्ताने जिवती येथे OXYGEN CONCENTRATOR वितरण.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढकार नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्ताने जिवती येथे OXYGEN CONCENTRATOR वितरण.



( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी )  धनपालसिंग वधावन,जिवती :-

कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता तिचा सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज राहायचे आहे. आपल्याला जनसेवेसाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे . संकटसमयी मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ता आपले नेते नितीनजींनी सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी जो पुढाकार घेतला तोच आदर्श समोर ठेवून आपणही सेवाकार्य करू , असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 9 oxygen concentrator चे वितरण करण्यात आले. यात प्रामुख्याने जिवती तालुक्यासाठी 2 दुर्गापूर साठी 3 ,वरोरा साठी 2, गडचांदूर साठी 2 असे एकूण 9 oxygen concentrator वितरित केले.यावेळी भाजप नेते रामपाल सिंह , हनुमान काकडे, गौतम निमगडे , जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते, दत्ताजी राठोड, तिरुपती कुंडगिर , सुधाकर राठोड , वरोरा येथील भाजप नेते बाबा भागडे, डॉ भगवान गायकवाड , जगदीश तोटावार, गडचांदूर येथील सतीश उपलेंचवार , रामसेवक मोरे , नथु नक्षीणे यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित पंचायत समिती उपसभापती  महेश  देवकते व भाजप पदाधिकाऱ्यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

Previous Post Next Post