WCL कर्मचार्याच्या आत्महत्येने खळबळ....
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) धनपालसिंग वधावन,बल्लारशाह :-
वेकोलिच्या बल्लारशाह क्षेत्रातील पोवनी-1 खुल्या खाणीतील लिपिकाने धोपटाळा वसाहतीतील आपल्या निवासस्थानी आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की पोवनी-1 खुल्या खाणीतील लिपिक अरविंद जुलमे ह्यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आढळून आला. रात्री जवळपास 12 वाजेपर्यंत ते आपल्या कुटुंबीयांसह होते. त्यानंतर झोपण्यास गेले मात्र सकाळी 7 च्या सुमारास अरविंद जुलमे वय 46 वर्ष आपल्या खोलीत नसल्याने कुटुंबियांनी दुसर्या खोलीत जाऊन बघितले असता त्यांचा मृतदेह फाशी लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असुन त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र मागील काही महिन्यात वेकोलि कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत असल्याने ह्यामागे कामाचा ताण आहे की अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाने ह्या घटना घडत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे.
घटनेची माहिती पोलिसांना देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक साखरे ह्यांच्या नेतृत्वात पो. शी. प्रविण डवरे, संपत पुल्लिपाका घटनास्थळी पोहोचले व कायदेशीर कारवाई पुर्ण करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठविण्यात आला आहे.
