Top News

Chandrapur Khelo India Trial 2026 | खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी 8 ऑगस्टला खेळाडू निवड चाचणी; 14 वर्षांखालील खेळाडूंना संधी

 



चंद्रपूर | खेलो इंडिया उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडिया अनिवासी प्रशिक्षण केंद्रासाठी 8 ऑगस्ट 2026 रोजी खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ही निवड चाचणी 30 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे ती रद्द करण्यात आली होती. आता ही चाचणी 8 ऑगस्ट रोजी सकाळी जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहे.

या निवड चाचणीत 14 वर्षांखालील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. इच्छुक खेळाडूंनी 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे. खेळाडूचा जन्म 30 जुलै 2013 ते 30 जुलै 2015 या कालावधीत झालेला असावा. निवड प्रक्रियेत उंचीला प्राधान्य दिले जाणार असून, सर्व खेळाडूंनी स्वतःच्या तयारीने उपस्थित राहावे. हे प्रशिक्षण केंद्र अनिवासी स्वरूपाचे आहे.

निवड चाचणीसाठी खेळाडूंनी आधार कार्ड, जन्मदाखल्याची प्रत आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच महानगरपालिका शाळांमधील जास्तीत जास्त खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करून निवड चाचणीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो. 9423673232) किंवा खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षक रोशन भूजाडे (मो. 7798174435) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.

Previous Post Next Post