Top News

गोविंदपूर ग्रामपंचायतीला मोठा धक्का! शासकीय निधीच्या गैरव्यवहारप्रकरणी उपसरपंच भोजराज ज्ञानबोनवार अपात्र




नागभीड | ग्रामपंचायत गोविंदपूर (ता. नागभीड) येथील उपसरपंच भोजराज उपासराव ज्ञानबोनवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम १४(ग) अंतर्गत अपर जिल्हाधिकारी, चिमूर यांनी अपात्र घोषित केले आहे. या आदेशामुळे त्यांचे उपसरपंचपद आणि ग्रामपंचायत सदस्यपद तत्काळ रिक्त झाले आहे.

गोविंदपूर येथील ग्रामस्थ पपील अशोक देशमुख यांनी शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर उपलब्ध पुरावे आणि नोंदींच्या आधारे शासकीय निधीचा गैरव्यवहार सिद्ध झाल्याचे नमूद करत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेचा आदेश दिला.

या निर्णयामुळे गोविंदपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जनतेच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कायद्याचा बडगा उगारला जाऊ शकतो, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून गेला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

दरम्यान, या आदेशानंतर ग्रामपंचायतीतील पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित पक्षाला नियमानुसार उच्च प्राधिकरणाकडे अपील करण्याचा अधिकार आहे.






Previous Post Next Post