Top News

UGC Equality Rules 2026 : यूजीसी समानता नियम २०२६ लागू करण्यासाठी राष्ट्रपतींकडे निवेदन सादर

 UGC Equality Rules 2026 : यूजीसी समानता नियम २०२६ लागू करण्यासाठी राष्ट्रपतींकडे निवेदन सादर






भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार  : उच्च शिक्षण संस्थांमध्ये जात, धर्म, लिंग तसेच दिव्यांगत्वाच्या आधारावर होणारा भेदभाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या UGC Samanta Niyam 2026 ची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी भीम आर्मी एकता मिशन, चंद्रपूर यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार, भद्रावती यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, University Grants Commission (UGC) कायदा देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता, मान्यता व शैक्षणिक मानके निश्चित करणारा सक्षम व वैज्ञानिक ढाचा आहे. १३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेले UGC Equality Rules 2026 हे २०१३ च्या नियमांच्या जागी लागू करण्यात आले असून, उच्च शिक्षण संस्थांमध्ये समता, सुरक्षितता व भेदभावमुक्त वातावरण निर्माण करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे.

या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती, गृहमंत्री तसेच एससी, एसटी, ओबीसी आयोग, भारत सरकार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

तालुका प्रभारी अन्वरभाई शेख यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार मनोज आकनुरवार यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी भाग्यश्री पवार, अतुल पाटील, राजेंद्र ढोक, मंगेश पवार आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post