Mahashivratri 2026: अखिल शिक्षक संघ नागभीडची सामाजिक बांधिलकी; पाणपोई व फळवाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागभीड : महाशिवरात्री निमित्त ग्राम नागभीड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवटेकडीवर भरलेल्या यात्रेला पंचक्रोशीतील हजारो शिवभक्तांची उपस्थिती लाभली. पहाटेपासून भाविकांनी शिवटेकडी गाठत दर्शन घेतले. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून पाणपोई व नाश्ता वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर अखिल नागभीड तालुका प्राथमिक शिक्षक संघाने सामाजिक बांधिलकी जपत सकाळपासून थंड पाणी व फळवाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविला. या सेवाभावी कार्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला. या उपक्रमाची दखल स्थानिक प्रशासन व विविध संघटनांनी घेत शिक्षकांच्या स्टॉलला भेट देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
पदाधिकाऱ्यांचे योगदान
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप चंदनबावणे, सरचिटणीस राहुल कळंबे, तसेच अखिल संघाचे पदाधिकारी गजेंद्र जवंजाळ, मंगेश कोरे, अरुण दोईतरे, नंदा दुरबुळे, वत्सला ठाकूर, रेखा आकरे, मंदा हटवार, मदन मरस्कोल्हे, गिरीश नगरे, नंदू मस्के, होमदेव नान्हे, मोहरकर, होमराज सलामे, किशोर कामडी, विजय भेंडारकर, नानाजी सहारे, प्रभाकर करंबे, रेवनाथ चिमुरकर, प्रशांत कोरे, महिपाल मांढरे, राजेश निमजे, मंगेश नौकरकर, संदीप कुंभरे, निकेश डोंगरे, रहांगडाले तसेच समस्त संघ सैनिक यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सिंदेवाही व नागभीड यांनी विशेष सहकार्य केले. महाशिवरात्री यात्रेदरम्यान राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे अखिल शिक्षक संघ नागभीड च्या सामाजिक दायित्वाची पुन्हा एकदा प्रचिती आली.
