Top News

Big Breaking : जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिमूर विधानसभा क्षेत्रा मध्ये राजकीय भूकंप; वारजुकर कुटुंबाचा भाजपात प्रवेश

 Big Breaking : जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी राजकीय ट्विस्ट; चिमूर विधानसभा क्षेत्रा मध्ये भाजपला मोठी ताकद ; वारजुकर कुटुंबाचा भाजपात प्रवेश



चंद्रपूर | जिल्हा परिषद  निवडणुकांच्या तोंडावर चिमूर विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसला धक्का देत वारजुकर कुटुंबाने अधिकृतरित्या भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.


Dead Body Found : नाल्यात अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.....आत्महत्या की हत्या? तपास सुरू

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा प्रवेश पार पडला. यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया (बंटी भांगडिया), माजी आमदार नामदेवराव उसेंडी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे तसेच भाजपा नेते विलास विखार, भाजपा चिमूर विधानसभा प्रमुख तथा न. प. नागभीड चे गटनेते व नगरसेवक गणेश तर्वेकर, नगरसेवक सचिन आकूलवार, नगरसेवक अवेश पठाण सह अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.


Dead Body Found : नाल्यात अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.....आत्महत्या की हत्या? तपास सुरू

माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, काँग्रेसचे माजी विधानसभा समन्वयक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर आणि शंकरपूरचे सरपंच व युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साईश वारजुकर यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत समर्थकांनसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Dead Body Found : नाल्यात अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.....आत्महत्या की हत्या? तपास सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अलीकडील भेट, त्यानंतरचा राजीनामा आणि आता अधिकृत पक्षप्रवेश  या सलग घडामोडींमुळे चिमूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Dead Body Found : नाल्यात अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.....आत्महत्या की हत्या? तपास सुरू 

विशेषतः आगामी जिल्हा परिषद  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी संघटनात्मक बळकटी ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. काँग्रेससाठी मात्र हा मोठा धक्का मानला जात असून, स्थानिक पातळीवरील परिणाम लवकरच दिसून येण्याची शक्यता आहे.

Previous Post Next Post