Top News

Breaking News – Revised schedule of postponed Municipal Council/Nagar Panchayat elections announced

 ब्रेकिंग न्यूज – स्थगित झालेल्या नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर 




चंद्रपूर, दि. ०४ : महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ मधील नियम १७(१)(ब) नुसार आवश्यक कार्यवाही न झाल्यामुळे स्थगित झालेल्या काही नगरपरिषद/नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार लागू करण्यात आला आहे.

🏛️ ज्या नगर परिषदांच्या जागांसाठी निवडणुका होणार

1️⃣ घुग्घुस नगर परिषद – अध्यक्ष व सर्व सदस्य
2️⃣ गडचांदूर नगर परिषद – प्रभाग क्र. ८-ब (सर्वसाधारण महिला)
3️⃣ मूल नगर परिषद – प्रभाग क्र. १०-ब (सर्वसाधारण)
4️⃣ बल्लारपूर नगर परिषद – प्रभाग क्र. ९-अ (ना.मा.प्र.)
5️⃣ वरोरा नगर परिषद – प्रभाग क्र. ७-ब (सर्वसाधारण)


▪️सुधारित निवडणूक कार्यक्रम

📌 नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख :
➡️ १० डिसेंबर २०२५, दुपारी ३.०० वाजेपर्यंत

📌 चिन्हवाटप व अंतिम यादी प्रसिद्धी :
➡️ ११ डिसेंबर २०२५

📌 मतदान (आवश्यक असल्यास) :
➡️ २० डिसेंबर २०२५
⏰ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

📌 मतमोजणी व निकाल जाहीर :
➡️ २१ डिसेंबर २०२५, सकाळी १०.०० पासून

📌 राजपत्रात निकाल प्रसिद्धी :
➡️ २३ डिसेंबर २०२५ पूर्वी (कलम १९ अन्वये)


जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

👉 अधिक अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा!

Previous Post Next Post