Top News

राजुरातील विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी जय भवानी कामगार संघटनेची धडक — सुरज ठाकरे यांचा वीज विभागाला इशारा...

राजुरातील विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी जय भवानी कामगार संघटनेची धडक — सुरज ठाकरे यांचा वीज विभागाला इशारा...

 



राजुराराजुरा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या सततच्या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त नागरिकांच्या समस्या अखेर ऐरणीवर आल्या आहेत. वारा, पाऊस असो वा उन्हाळा, विजेचा पुरवठा खंडित होणे हे राजुरा तालुक्याचे जणू नित्याचेच झाले आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा निघावा, या मागणीसाठी आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयात निवेदन देण्यात आले.

संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या निवेदनात राजुरा व परिसरातील वीज उपकेंद्राचे आधुनिकीकरण व क्षमतेत वाढ करणे, ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरची अदलाबदल करणे, तसेच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा कायमस्वरूपी स्थिर ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.


सुरज ठाकरे यांनी यावेळी सांगितले की,

“राजुरा शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव हा जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहतो आहे. शासनाने सर्व कामकाज ऑनलाइन केले असताना, वारंवारच्या वीज खंडामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सरकारी कार्यालये यांचे कामकाज ठप्प होत आहे. आता ही परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही.”


विजेच्या लपंडावाचे दुष्परिणाम

राजुरा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होतो, रुग्णालयात अंधारामुळे आरोग्यसेवांवर परिणाम होतो, तसेच सिंचन पंप, लहान उद्योग, दुकाने आणि कारखाने बंद पडल्याने शेतकरी व व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.


 उपस्थित पदाधिकारी :

या निवेदनावेळी संघटनेचे युवा शहराध्यक्ष श्री. रोहित बत्ताशंकर, तसेच राजू लड्डा, श्रावण साळवे, अतुल सिंग, साहिल कायडिंगे, चेतन मेश्राम, बालाजी चौधरी, ऋतुज जुलमे, आर्यन दुबे आदी सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सुरजभाऊ ठाकरे यांनी शेवटी इशारा दिला की,

 “राजुरा तालुक्यातील नागरिकांच्या सहनशीलतेची आता मर्यादा संपली आहे. जर वीज वितरण कंपनीने त्वरीत ठोस कारवाई केली नाही, तर जय भवानी कामगार संघटनेतर्फे तीव्र आंदोलन उभारले जाईल.”

Previous Post Next Post