Top News

सीतारामपेठमध्ये वाघाचा धुमाकूळ संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कार्यवाही सुरु.

 सीतारामपेठमध्ये वाघाचा धुमाकूळ संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कार्यवाही सुरु.




चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील सीतारामपेठ बिट परिसरात वाघाच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सतत सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे मानवी जीवितहानीबरोबरच पशुधनाची देखील मोठी हानी होत आहे.

दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी सीतारामपेठ बिट परिसरात अमोल नन्नावरे राहणार भामरडोहळी हे शेतात जात असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. या घटनेने स्थानिक नागरिकांत प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना ताजी असतानाच मिळालेल्या माहिती नुसार 29 सप्टेंबर ला रात्री च्या सुमारास सीतारामपेठ गावा जवळ विठ्ठल भोयर यांची गाय वाघाने ठार केली तर दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:00 वाजताच्या सुमारास काही गावकर्यांना वाघ रस्ता ओलांडताना दिसला.

गेल्या सहा महिन्यांपासून या परिसरात वाघाच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जनावरे ठार झाली आहेत. इतकेच नव्हे तर मोहरर्ली मार्गावर. मोटारसायकलस्वारांवरही हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात पाच जणांचा बळी गेला आहे.

स्थानिकांचे म्हणणे आहे की. वाघाच्या भीतीमुळे गावकऱ्यांचे शेतात जाणेही कठीण झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

यावर मोहूरर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी  संतोष थिपे यांच्या सोबत. विदर्भ माझा न्युज 24 ने संपर्क साधला असता माहिती देताना सांगितले की. 

वाघाला पकडण्यासाठी नियंत्रण कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.वाघाला शक्य तितक्या लवकर पकडून सुरक्षित स्थळी हलविण्यात येनार आहे. जेणे गावकऱ्यांवरील दहशत दूर होईल असे मत थिपे यांनी व्यक्ती केले.


मुख्यसंपादक तथा संपादक 

पराग रीता सुरेश गुंडेवार 

8668781673



Previous Post Next Post