Top News

नगर परिषद बल्लारपूर कडून ‘हर घर तिरंगा’ अभियानात देशभक्ती, स्वच्छता आणि पर्यावरणाचा संगम.....

नगर परिषद बल्लारपूर कडून ‘हर घर तिरंगा’ अभियानात देशभक्ती, स्वच्छता आणि पर्यावरणाचा संगम.....



बल्लारपूर : देशभर साजऱ्या होत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद बल्लारपूरने स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वच्छता मोहिमा, भव्य मिरवणूक, वृक्षारोपण आणि शालेय पातळीवरील देशभक्तीपर स्पर्धांचे आयोजन करून शहरात देशभक्तीची लाट निर्माण केली.

स्वच्छता मोहिमेअंतर्गत गोड़ राजे खांडक्या बल्लाळशाह आत्राम समाधी स्थळ व गणपती घाट परिसरात सफाई मोहीम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार तसेच प्राणवायू फाउंडेशनचे स्वयंसेवक सहभागी झाले.

भव्य मिरवणुकीत नगर परिषदेच्या पथकासह विविध संस्थांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी देशभक्तीपर संदेश दिले. शिवाजी महाराज स्मारक मार्गे काढलेल्या या मिरवणुकीत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करण्यात आले.


पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. प्राणवायू फाउंडेशनच्या सहकार्याने हिरवळ वाढविण्याचा संकल्प करण्यात आला. विविध छायादार व फुलझाडांची लागवड करून ‘प्रत्येक घरासमोर एक तिरंगा आणि प्रत्येक परिसरात एक झाड’ हा संदेश देण्यात आला.


शाळांमध्ये तिरंगा गीत स्पर्धा, प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा रांगोळी, तिरंगा प्रतिमा इत्यादी स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यात आली. विविध शाळांतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी या सर्व उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतलेल्या अधिकारी-कर्मचारी, नागरिक आणि सहकार्य संस्थांचे आभार मानले.

Previous Post Next Post