Top News

रा. म. गांधी महाविद्यालयात अवयव दान पंधरवडा निमित्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन

रा. म. गांधी महाविद्यालयात अवयव दान पंधरवडा  निमित्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 



नागभीड : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अवयव दान पंधरवडा या कार्यक्रमांतर्गत रांगोळीच्या माध्यमातून नश्वर मानवी शरीर किंवा विशिष्ट अवयव दान करून मृत्यूनंतरही  मानवाला नवीन जीवन देऊन  एक प्रकारची नवसंजीवनी देता येते. अवयवदान याविषयी भारतामध्ये पाहिजे त्या प्रमाणात  जनजागृती अजून पर्यंत   झालेली  नाही. शासनाच्या वतीने  ३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान अवयव दान  पंधरवडा साजरा करून या विषयावर जनजागृती समाजात करावी  या उद्देशाने विविध उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांन मार्फत राबविण्यात यावे या अनुषंगाने  रा. म.  गांधी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांच्या  उपस्थितीत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सुबक रांगोळी काढून अवयव दानाचा मोलाचा  संदेश दिला  जागतिक अवयवदान दिन प्रत्येक वर्ष  13  ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. जागतिक स्तरावर  या दिवशी लोकांना अवयवदानाबद्दल जागरूक करण्याचा उद्देश असतो, जेणेकरून त्यांचा शरीरांतील अवयव दुसऱ्या कोणाचे जीवन वाचवण्यासाठी वापरता येईल. या स्पर्धेमध्येत  ज्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले त्यांना पारितोषिकाने अलंकृत केले जाईल रांगोळी स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. राजेंद्र चव्हाण डॉ. आर.जे. रुडे व प्रा. कु. नीरा सिंग व इतर मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous Post Next Post