Top News

Nagbhid taluka Z.P. Teacher Rahul Kalambe selected for Singapore educational tour....

नागभीड तालुक्यातील जि.प. शिक्षक राहुल कळंबे यांची सिंगापुर शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड....



   नागभीड ::  नागभीड तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा, कोटगाव येथे कार्यरत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल कळंबे यांची महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या माध्यमातुन सिंगापुर येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. 

         आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती या दौऱ्यात मिळणार आहे. महाराष्ट्रातून १५० शिक्षक जाणार असुन २२ ते २७ मार्च दरम्यान होणाऱ्या पहिल्या टप्प्यात ५० शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यात राहुल कळंबे यांची निवड झाली आहे. राहुल कळंबे यांचे सर्व स्तरातून अभिनंदनास्पद कौतुक करण्यात येत आहे. 


📲 बातमी, लेख, कविता व जाहिराती करिता संपर्क साधा :: मुख्यसंपादक तथा संपादक -- पराग गुंडेवार 8668781673

Previous Post Next Post