Top News

बाल आनंद मेळाव्याचे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते उद्घाटन.

 बाल आनंद मेळाव्याचे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते उद्घाटन.. 


 चंद्रपूर / राजुरा | उपजिल्हा प्रतिनिधी | मनोज श्रीहरी गोरे :-- राजुरा तालुक्यातील आदर्श गाव तसेच एक उपक्रमशील स्मार्ट गाव म्हणून ओळख असलेल्या  मौजा कळमना येथे  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. कळमना हे गाव सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहेत गावातील पालकांनी या बाल आनंद मेळावात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अनेक सुंदर फराळाचे पदार्थ तयार करून व स्टाल लावून विक्री साठी ठेवले. यांचा आस्वाद घेण्यासाठी बहुसंख्य नागरिक उपस्थित झाले, सर्वांनी या चिमुकल्यांचे कौतुक केले. यावेळी माता पालक महिलांचा  पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार शाळेच्या यांच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी उद्घाटक म्हणून आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, बाल आनंद मेळाव्याचे उत्कृष्ट असे आयोजन केले असून अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळते, मन, बुद्धी भावना यांना चालना मिळते असे मत व्यक्त केले.     

          या प्रसंगी कार्यक्रमाचे ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रंजना दिवाकर पिंगे, विशेष अतिथी पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, उपसरपंच कौशल्या मनोहर कावळे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता ऋषी उमाटे,  मुख्याध्यापिका बेबीनंदा दुधे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रावण गेडाम, सदस्य रामचंद्र कुकुडे, कवडु पाटील गौरकार, सुरेश आत्राम मंगेश क्षिरसागर, गुरूदेव सेवा मंडळाचे सचिव दत्ताजी पिंपळशेंडे, शाळेचे शिक्षक दिलीप निमकर, शालीक पेंदोर, लता क्षिरसागर, संगीता उमाटे, सुचिता धांडे, कल्पना क्षिरसागर संगीता महादेव ताजणे, अल्का ताई रत्नाकर गेडाम, सुनिता सुरेश गौरकार यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक वनिता गौखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शालीक पेंदोर  यांनी मानले.

Previous Post Next Post