वुक्षारोपण करुन सरपंच नंदकिशोर वाढई यांनी साजरा केला वाढदिवस.
चंद्रपूर / राजुरा | उपजिल्हा प्रतिनिधी | मनोज श्रीहरी गोरे :-- राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कळमना येथे वुक्षारोपण करुन अत्यंत साध्या पद्धतीने मात्र समाजोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक लोक बडेजाव करतात मात्र अत्यंत साध्या पध्दतीने केक न कापता, जिथे आपण प्राथमिक शिक्षण घेतले त्याच शाळेत वुक्षारोपण करुन त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी शाळेच्या वतीने राजमाता मा जिजाऊ साहेबा यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे यांनी सांगितले की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी जोपासीत कळमना गावाचे नाव तालुकातच नव्हे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात मोठे केले. त्यांच्या विविध उपक्रमांची भूरळ अनेकांना पडली असून अनेक गावांमध्ये सुध्दा ते उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. नक्कीच पुढे सुध्दा फार मोठी समाजसेवेची संधी त्यांना मिळेल व त्यांच्या नेतृत्व गुणांची दखल घेतली जाईल अशी भावना बोलून दाखवली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, उपसरपंच कौशल्या मनोहर कावळे, ग्रामपंचायत सदस्य रंजना दिवाकर पिंगे, सुनीता उमाटे, मुख्याध्यापिका बेबीनंदा दुधे, शिक्षक दिलीप निमकर, शालीक पेंदोर, वनिता गौखरे, अमोल निमकर, आकाश चापले, शालुना उमाटे, संगीता गेडाम, अल्काताई गेडाम, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
