Top News

महाशिवरात्री महोत्सवात कॉमेडी कलाकारांची तुफान फटके बाजी..!!

महाशिवरात्री महोत्सवात कॉमेडी कलाकारांची तुफान फटके बाजी..!!

आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते झाले महोत्सवाचे उद्घाटन..!!


सामाजिक भान जपत नागभिड तालुक्यातील पत्रकारांचा केला सत्कार..!!


श्रध्येय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शिवटेकडी लॉन चे भूमीपूजन आदरणीय आम. बंटी भांगडिया यांच्या हस्ते संपन्न..


नागभिड : मान.आम.बंटी भांगडीया यांच्या मार्गदर्शनात नागभिड महाशिवरात्री महोत्सव समितीच्या वतीने महाशिवरात्री महोत्सवाचे २६ फेब्रुवारी ते ६ मार्च आयोजन करण्यात आलेले असून २६ फेब्रुवारी यात्रेच्या दिवशी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी वितरण, २७ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर चे आयोजन करण्यात आले.. १ मार्च ला स्टँड अप कॉमेडी शो चे आयोजन करण्यात आले.. यात एहसान कुरेशी, विजय पवार, सुनील पाल, गौरव मोरे, वनिता खरात यांनी आपल्या कॉमेडी ने प्रेक्षकांना पोट धरून हसविले.पुष्पा फेम अभिनेता अजय मोहिते यांनी सुध्दा  प्रेक्षकांचे मनोरंजन केले.



या महोत्सवाचे उद्घाटन आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम श्रध्येय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शिवटेकडी लॉन चे भूमीपूजन आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा,डॉ.राजन जयस्वाल,भाजप ज्येष्ठ नेते वसंत वारजूरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, गौरव भैया  ब्रह्मपुरी, ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, माजी प्राचार्य डॉ.अमीर धमानी सर, जि. प. माजी सदस्य संजय गजपुरे,  प्रा.डॉ.उमाजी हीरे, नागभीड  तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम पाथोडे , प्रा,गणपत देशमुख, भारत सरकार नोटरी ॲड.रवींद्र चौधरी, सिंदेवाही येथील प्रसिद्ध डॉ. सतीश चिंतावार, ज्येष्ठ व्यापारी गुलजार धमानी, जहांगीर कुरेशी, ऍड.आनंद घुटके, प्राचार्य देविदास चीलबुले, मॉर्निंग वॉक संघटनेचे अध्यक्ष निमजे, सदस्य अनिलजी लांबट, गुलाबराव भानारकर, आकरे , समर्थ , जयंती पटेल, यांची उपस्थिती होती.. यावेळी आम. बंटी भांगडीया व  मॉर्निंग वॉक संघटना यांच्या हस्ते नागभिड शिवटेकडी येथील प्रसिद्ध मूर्तीचे मूर्तिकार देवा रंगारी राजनांदगाव यांचे शाल, श्रीफळ, त्रिशूल व फोटो देत सत्कार करण्यात आला तसेच नागभिड येथील मंगला कामुनवार, राहुल कामुनवार, रंजन कामुनवार यांचा आमदार महोदयांच्या हस्ते शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.

तसेच नागभिड तालुक्यातील सर्व उपस्थित पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देत सत्कार करण्यात आला. नागभिड तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्याम पाथोडे यांनी मनोगत व्यक्त केले तर डॉ.अमीर धमाणी यांनी महशिवरात्री महोत्सवा बाबत आपले विचार व्यक्त केले. यावेळी महाशिवरात्री महोत्सव समिती च्या वतीने आम.बंटी भांगडिया यांचा पेशवे कालीन पगडी, शेला, त्रिशूल व भव्य हाराने स्वागत करण्यात आले.. तर महिला कार्यकारणीच्या वतीने समई भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग भानारकर यांनी केले, प्रास्ताविक गणेश तर्वेकर यांनी तर आभार संतोष रडके यांनी मानले.

 

आज कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय गायिका गीता बेन रबारी यांच्या लाईव्ह म्युझिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे..!!!

Previous Post Next Post