कळमना येथे शिवजयंतीनिमित्य वुक्षारोपण.....
मनोज श्रीहरी गोरे | उपजिल्हा प्रतिनिधी | चंद्रपूर/ राजुरा :: रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कळमना स्मशानभूमी येथील आक्सिजन पार्क मध्ये वुक्षारोपण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र साजरी केली जातेच मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कळमनाचे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी आपल्या उपक्रमशीलतेचे व्रत जोपासित गावत लोकसहभागातून वृक्षारोपण करून महाराजांना अभिवादन केले. त्यांच्या आवाहनस प्रतिसाद देत गावचे ग्रा. प. सदस्य, पोलीस पाटील, शिक्षक व ग्रामसेवक व गावातील दाते मंडळी यांनी सहभाग घेतला आणि विविध फुलं झाडे व जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस दान स्वरुपात दिलेत. यावेळी कळमनाचे पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, मुख्याध्यापक बेबीनंदा दुधे, शिक्षक दिलीप निमकर, शालीक पेंदोर, वनिता गौखरे, गोवारदिपे सर, कुळसगे सर, ग्रामसेवक सिताराम मरापे, बंडु देवाळकर , वेंकटरतन, अमोल निमकर या सगळ्यांनी गुलाबी बाग फुलवण्यासाठी मदत केली. त्यामुळे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या या कार्याची पंचक्रोशीतील गावातील लोकांना आदर्श संकल्पना वाटत आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना प्रत्येक गावागावात राबविल्या गेल्या पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं सर्व महापुरुषाचे विचार जनमानसात रुजलेली बघायला मिळेल अशी भावना व्यक्त होत आहे.
या प्रसंगी दिलीप निमकर, शालीक पेंदोर, श्रावण गेडाम, कवडु मुठलकर, शामराव चापले, रावजी वाढई, नत्थु वसाके, ज्ञानेश्वर ताजने, गयाबाई गेडाम, शोभा गेडाम, शोभा आत्राम, नाजुका आत्राम, मिनाताई क्षिरसागर यासह गावकरी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
