मोठा राजकीय भूकंप....सुरज ठाकरे यांचा आम आदमी पार्टी च्या पदांचा राजीनामा.....
राजुरा विधानसभा क्षेत्रातून लढणार अपक्ष निवडणूक....
ही लढाई फक्त निवडणुकीची नसून लोकांच्या हक्कांशी संबंधित आहे. - सुरज ठाकरे
राजुरा :: राजुरा विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ होतांना दिसत आहे. सुरज ठाकरे हे अपक्ष उमेदवारीसाठी सज्ज होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व आप कामगार विभागाच्या जिल्हा अध्यक्ष पदांचां सहकार्यनसह राजीनामा देत आम आदमी पक्षाला सुरज ठाकरे यांनी राम राम ठोकला आहे.
सुरज ठाकरे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून या क्षेत्रात एक वेगळा वलय निर्माण केले आहे. त्यांच्या अपक्ष उमेदवारीच्या निर्णयामुळे अनेक पक्षांना मोठा झटका बसला आहे. निवडणुकीतील गणिते आता बदलण्याची चिन्हे आहे.
हरियाणातील पराभवामुळे आम आदमी पक्ष येणाऱ्या दिल्ली च्या विधानसभा निवडणुकी साठी तयारीला लागणार असून महाराष्ट्रातील निवडणुका लढवणार नाही, असे संकेत सूत्रांच्या मार्फत मिळाले आहे.
त्या मुळे ठाकरे समर्थकान मध्ये नाराजगीचे सुरु होते. हे पाहता आपण अपक्ष लढू असा निर्धार ठाकरे यांनी केले असून त्यांनी आम आदमी पक्षाच्या पदांचां राजीनामा दिला आहे.
सुरज ठाकरे यांनी अपक्ष लढण्याचा विचार करत राजकीय भवितव्य नव्याने आकारण्याचे संकेत दिले. जनता पर्यायी मार्ग निवडण्यासाठी सज्ज आहे आणि जर आम्ही लढलो नाही तर जनतेचा विश्वास गमावून बसू असेही त्यांनी नमूद केले.
सुरज ठाकरे हे फक्त राजकीय नेता नसून सामाजिक कार्यकर्ता आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणार व्यक्तीमहत्व आहे. असं त्यांच्या बाबतीत सर्व सामान्यांचं, कामगार वर्गाच मत आहे.
त्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात २७ पेक्षा अधिक आंदोलने यशस्वीपणे उभी केली, ज्यात शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे प्रशन, कामगारांच्या हक्क चे प्रशन, महिलांसाठीच्या सुविधा, तसेच पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे मोठे आंदोलन समाविष्ट होते. यामुळे राजुरा आणि आसपासच्या भागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
गावागावांतील बूथ बांधणी आणि प्रचार यंत्रणा उभारण्यातही सुरज ठाकरे आघाडीवर आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर वेगवान आणि तडजोडीशिवाय तोडगा काढणे ही त्यांची कार्यशैली जनतेच्या मनात घर करून आहे. राजकीय पक्षांच्या उदासीनतेमुळे वैतागलेल्या मतदारांना सुरज ठाकरे एक विश्वासार्ह पर्याय असल्याची चर्चा आहे.
आम आदमी पक्षाने पूर्वीच झाडू यात्रा आयोजित करून राजकीय मैदानात ठाकरे यांचे नेतृत्व उभे केले होते. मात्र, हरियाणातील पराभवामुळे पक्षाने आता महाराष्ट्रात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने सुरज ठाकरे हे पक्षाला राजीनामा देत अपक्ष रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सुरज ठाकरे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नव्या राजकीय समीकरणांचा उदय होणार आहे. राजुरा मतदारसंघात ठाकरे यांचे सामाजिक कार्य आणि लोकाभिमुख दृष्टिकोन त्यांना प्रस्थापित नेत्यांपेक्षा वेगळे ठरवतात. सत्ता आणि पैसा यांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षांना ठाकरे यांनी आपल्या कर्तृत्वावर निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आहे. राजकीय तडजोडी आणि अप्रामाणिकता टाळून जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र कार्यरत राहणे हेच त्यांचे ब्रीद आहे.
सुरज ठाकरे यांनी राजुरा मतदारसंघातील पाणीपुरवठा, शेतमालाला भाव, कामगारांच्या सुविधा आणि महिला सुरक्षेसाठी अनेक ठोस पावले उचलली आहेत.
त्यांच्या मते, "ही निवडणूक फक्त जिंकण्यासाठी नाही तर जनतेच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आहे." त्यांनी स्पष्ट केले की, "सत्तेत नसलो तरी लोकांसाठी झटत राहणे हेच माझे ध्येय राहणार आहे. "
गेल्या पंधरा वर्षांत राजुरा मतदारसंघातील विकास ठप्प झाला असल्याची भावना मतदारांमध्ये आहे. प्रस्थापित नेत्यांच्या कामाचालवू नीती मुळे पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेत. अशा परिस्थितीत, सुरज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याकडून मतदारांना आशा आहे की ते राजकीय आणि सामाजिक परिवर्तनासाठी पुढे येतील. त्यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केला आहे. लोकांचा पाठिंबा हा त्यांचा सर्वात मोठा आधार ठरणार आहे. सुरज ठाकरे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राजुरा विधानसभा निवडणुकीत नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
