प्रकल्पगस्तांना न्यायासाठी नंदकिशोर वाढईंची मुख्य महाप्रबंधकांशी चर्चा.
चंद्रपूर/राजुरा | मनोज श्रीहरी गोरे | उपजिल्हा प्रतीनिधी :-- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळसा खाणींचे प्रमाण मोठे आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती ही वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड बल्लारपूर मुळे बांधीत आहे. अशा प्रकल्पगस्त शेतकऱ्यांना 0-80 आर शेत जमीनी वर वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड बल्लारपूर यरिया मध्ये नोकरी देत नाही. शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतजमिनी पुर्णपणे बांधीत झाल्यामुळे त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जमीनी चा मोबदला मिळाला त्यावर पुढील काळात त्यांना जिवन जगताना फार मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होणार आहे. म्हणून त्यांना नोकरी देणे गरजेचे आहे. जि एम आफीस मध्ये चकरा मारून ही त्यांना न्याय मिळत नाही. 0-80 आर शेत जमीन रजिस्ट्रेरी करताना कुठलही ध्येय धोरण आड आले नाही परंतु नोकरी देत असताना मात्र 0-81 आर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना नोकरी देत आहे. हा दुजा भाव चाललेला आहे. हा प्रकल्प गस्त शेतकऱ्यांना अन्याय आहे म्हणून अ. भा. सरपंच परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, राजीव गांधी पंचायती राज संघटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी या प्रकल्प गस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत शेतकऱ्यांना घेऊन मुख्य महाप्रबंधक वेकोली यांची भेट घेऊन प्रकल्प गस्त शेतकऱ्यांना नोकरी देण्यात यावी या मागणीसाठी निवेदन दिले व चर्चा केली. यावेळी प्रकल्प गस्त शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
