युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी जितेंद्र लाखोटिया यांची निवड

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी जितेंद्र लाखोटिया यांची निवड 



तेल्हारा | (ता.प्र.) मनोज भगत ::  तेल्हारा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र नथमलजी लाखोटिया यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारा पत्रकार जितेंद्र लखोटिया यांची अकोला जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.पत्रकार म्हणून त्यांना प्रदीर्घ अनुभव असून जिल्हाभरातील पत्रकारांशी त्यांचा परिचय आहे .प्रेस क्लब हिवरखेडचे सचिव म्हणून लखोटिया यांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा , कृषी तसेच राजकारणी आदि विषयावर नेहमी समाजोपयोगी बातम्या प्रकाशित केल्या आहेत. कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामीण भागातील पत्रकारांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेशी जोडेल अशी प्रतिक्रिया जितेंद्र लखोटिया यांनी दिली.जितेंद्र लखोटिया आपल्या नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  गणेश कचकलवार, महिला प्रदेशाध्यक्षा  केतकी विशाल पांडे, विभागीय अध्यक्ष  विजय सूर्यवंशी , जिल्हाध्यक्ष रितेश टीलावत यांना देतात.