तालुक्यातील 56 ग्रामपंचायती चे आरक्षण जाहीर

तालुक्यातील 56 ग्रामपंचायती चे आरक्षण जाहीर




नागभीड : महाराष्ट्र ग्रामपंचायत [ सरपंच आणि उपसरपंच ] निवडणूक नियम, 1964 च्या नियमानुसार सन 2025 ते 2030 या 5 वर्षाच्या कालावधीकरीता अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील महिलाकरीता सरपंच पदाचे आरक्षण तालुक्यातील 56 ग्रामपंचायत करीता दि. 23 एप्रिल रोज बुधवारला दुपारी 2 वाजता दरम्यान तहसिल कार्यालय, नागभीड येथील सभागृहात निश्चित करण्यात आले.

यात अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी पाहार्णी, पळसगाव [खुर्द], सोनुली [बुज], अनुसूचित जाती महिला साठी पेंढरी [बरड], कोसंबी गवळी, मेंढा किरमिटी, चींधीचक या ग्रामपंचायती चे आरक्षण निघाले आहे. अनुसूचित जमाती सर्वसाधारण चिकमारा, आकापुर, वासाळा मेंढा, पान्होळी, सोनापुर [बूज.] या ग्रामपंचायती चे आरक्षण निघाले आहे. 

तर अनुसूचित जमाती महिला साठी देवपायली, किटाळी बोर. वैजापूर, पारडी ठवरे, वलनी, नांदेड या ग्रामपंचायती चे आरक्षण निघाले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग ना.मा.प्र. सर्वसाधारण गोविंदपुर, जनकापुर, नवेगाव पांडव, गिरगाव, ढोरपा या ग्रामपंचायती चे आरक्षण निघाले तर ना. मा. प्र. महिला साठी मौशी, बिकली, गंगासागर हेटी, ओवाळा, किरमिटी या ग्रामपंचायती चे आरक्षण निघाले आहे. 

खुला प्रवर्ग मधून सर्वसाधारण चिखलगाव, खडकी, मांगरुळ, नवेगाव हुंडेश्वरी, बोंड, तळोधी [बा.], कानपा, कोर्धा, विलम, कोजबी माल, उश्रळ मेंढा, पांजरेपार, कोथुळणा, मांगली अरब इत्यादी ग्रामपंचायती चे आरक्षण निघाले आहे तर खुला प्रवर्ग महिला साठी बाळापूर [बूज], कन्हाळगाव, आलेवाही, किटाळी मेंढा, मोहाळी मोकासा, वाढोना, येनोली माल, सावरगाव, चारगाव चक, मिंडाळा, कोटगाव, बाळापूर [खुर्द], मिंथुर, म्हसली या ग्रामपंचायती चे आरक्षण निघाले आहे.

यात अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी 03, अनुसूचित जाती महिला साठी 04, अनुसूचित जमाती सर्वसाधारण 05, अनुसूचित जमाती महिला 06, ना. मा. प्र. सर्वसाधारण 05 तर ना. मा. प्र. महिला 05, खुला प्रवर्ग सर्वसाधारण 14 खुला प्रवर्ग महिला 14 अश्या एकूण 56 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निघाले आहे. 56 पैकी 29 ग्रामपंचायती वर महिला सरपंच गावाचे प्रथम नागरिक म्हणून काम करणार आहेत.

आरक्षण निघालेल्या आठ ग्रामपंचायती चे 2024 ते 2029 साठी 24 डिसेंबर 2024 ला आरक्षण निघाले होते. त्यामुळे 2025 ते 2030 या मध्ये त्यांचा समावेश राहणार नाही. त्यात वासाळा मेंढा [अनुसूचित जाती महिला राखीव] खडकी, नवेगाव पांडव [अनुसूचित जमाती महिला राखीव], सोनापुर [बूज], गंगासागर हेटी [सर्वसाधारण], येनोली माल, उश्राळा मेंढा, किटाळी मेंढा [सर्वसाधारण स्त्री] अश्या प्रकारे आरक्षण निघाले होते. या ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना, मतदार यादी, व इतर बाबी पूर्ण झाल्याने यांच्या निवडणुका केव्हा ही जाहीर होऊ शकतात.

यावेळी नागभीड चे तहसीलदार प्रताप वाघमारे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी जाधव, कदम तसेच नायब तहसीलदार उमेश कावळे यांच्या अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.