आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री (म.रा.) ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ब्राहपुरी येथील अनेकांचा भाजपात प्रवेश
पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध उद्योजक व माजी नागराध्यक्ष तथा माजी नगर सेवकांचा समावेश
वरोरा :: देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कार्यवर विश्वास ठेऊन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांच्या नेतृत्वात आज वरोरा येथे शासकीय विश्राम गृहात भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री (म. रा.) ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ब्रम्हपुरी चे प्रसिद्ध उद्योजक दिपक उराडे, माजी नगराध्यक्ष सौ.रिता दीपक उराडे, किसान सेल काँग्रेस चे अध्यक्ष नानाजी तुप्पट, माजी नगरसेवक सुधीर राऊत, शिरीष साखरकर, राहुल ठेंगरी, डॉ. सौरभ लांजेवार, प्रज्वल निकुरे, गणेश धनजुळे, शंतनू लाखे,चेतन खेते सह अनेकांनी आज प्रवेश केला आहे.
या वेळी हंसराज अहिर माजी गृहराज्या मंत्री तथा अध्यक्ष राष्ट्रीय मागास वर्गीय आयोग,आमदार करण देवतळे, भाजपा नेते कृष्णा सहारे, भाजपा नेते विलास विखार, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर,चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, राजू मामा मिश्रा सह अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.