Top News

बंजारा समाजाची संस्कृति - जतन वतन जनजागृती कार्यक्रमातून बंजारा कवीजन करतात. - शेखर महाराज

बंजारा समाजाची संस्कृति - जतन वतन जनजागृती कार्यक्रमातून बंजारा कवीजन करतात. - शेखर महाराज 


 आर्णी (ता. प्र.) हिरासिंग राठोड :: तालुक्यातील सावळी सर्कल मधील संत कनिराम महाराज बापू यांच्या आश्रमात.बंजारा समाजाचे जनजागृती कवीतत्व करणारे बंजारा बोली भाषेत भजन म्हणारे महाराज यांना ओळख पत्र देण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर मंडळी होते.        कार्यक्रमाचे अध्यक्ष संत कनिराम महाराज तर प्रमुख पाहुणे संत शेखर महाराज पोहरादेवी.अतिथी   रमेश पवार (कारभारी दिग्रस) विष्णु उंकडे उपाध्यक्ष शिवसेने यवतमाळ.प्रकाश राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ.किसन राठोड तालुकाध्यक्ष आर्णी भाजप.प्रकाश राठोड उपाध्यक्ष तांडा समिती यवतमाळ.नुरसींग राठोड अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना आर्णी.सुरेश राठोड उपाध्यक्ष -प्रेस क्लब सावळी सदोबा.कार्यक्रमाचे आयोजक -ह.भ.प.शंकरगिरी महाराज महागाव यांनी केले होते. 



बंजाराचे कुल दैवत संत सेवालाल महाराज यांचे वंशज शेखर महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की.बंजारा समाज निसर्ग प्रेमी आहे.जगंलातून विविध शहरांमध्ये जाणार रस्ते आजच्या काळात लदणी चे मार्ग दळणवळण ची रस्ते झाले आहे.व्यापर.धाडशी यौध्दा.पराक्रम गाजविणारे बंजारा समाज बांधव होते.गायी.गुरे यांचा एक प्रकारे सेवा करणारे गोधन रक्षक होते.असे सांगितले.उपस्थीत मान्यवरांचे हस्ते.ओळखपत्र देण्यात आले.यावेळी उपस्थित महाराज यांना पोहरादेवी येथील नगारा भवन लोकपर्ण सोहळा साजरा होणारा असल्याची माहिती देण्यात आली.भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नगारा भवन लोकपर्ण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.२६/९/२०२४ला पोहरादेवी येथे येणार आहे.वेगो नगारा चोलो पोहरा असे बीद्र वाक्य जोडले आहे.असे आयोजकांनी संदेश दिला आहे.

Previous Post Next Post