चंद्रपूर जिल्हा होतोय का वेब सिरीज चा मिर्झापूर?
त्या हत्येमुळे एक अध्याय समाप्त झाल्याची चर्चा... आरोपी अटकेत...
हाजी सरवर शेख (अली) चा अंदा धुंद गोळीबारात मृत्यू...
चंद्रपूर (चांडागढ) :: चंद्रपूर जिल्ह्यात हत्यासत्र काही थांबताना दिसे ना चंद्रपूर जिल्हा जणू वेब सिरीज मधला मिर्झापूर झाला का? अशी चर्चा रंगू लागली आहे. भर दिवसा गोळी बार करणे, शस्त्र बाळगणे जणू कि वेब सिरीजचा मिर्झापूरच मागील महिन्यांपासून जिल्हात गोळीबाराच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. यातच गुन्हेगारीच्या आलेख वाढताना दिसून येत आहे. यातच काल चंद्रपूर शहरातील बिंनबा गेट परिसरामध्ये असलेल्या शाही दरबार मध्ये झालेल्या गोळीबाराने जिल्हा हादरला आहे.
सविस्तर वृत्त असे कि सोमवारी दि. 12/8/2024 ला घटनेची पुनरावृत्ती झाली. शहरातील बिनबा गेट परिसरात कोलमाफिया हाजी सरवर शेख याला शाही दरबार हॉटेल मध्ये जेवण करत असताना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी घटनेतील मुख्य आरोपी समीर शेख व त्याच्या अन्य साथीदारांना अटक केली. घटनेला मूर्तरूप देण्यासाठी वापरलेली बंदुक, चाकू व चारचाकी वाहन जप्त केले आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे करीत आहे.
हत्तेच्या एकातासातच गवसले आरोपी
बिनबा गेट परिसरात गोळीबार करून हत्तेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. आरोपी महिंद्रा सफारीने पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलसांनी सूत्र हलविले. आरोपींना मुख्यरस्त्यावर अटक करण्यात आली. समीर शेख सोबत असलेले अन्यआरोपी यवतमाळ व दिग्रसचे असण्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. तूर्तास सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
जुन्या मित्रानेच काढला मित्राचा काटा...
घटनास्थळी सुरू असलेल्या चर्चेनुसार कोलमाफिया हाजी शेख व त्याची हत्या करणारा समीर शेख हे कधीकाळी मित्र होते. परंतु नंतर त्यांचात बिनसले.
आरोपी अटकेत; दिवसाढवळ्या पुन्हा गोळीबार...असा घडला प्रकार
बिनबा गेट परिसरातील हॉटेल शाही दरबार येथे हाजी शेख आपल्या मित्रांसह दुपारी 4 वाजता दरम्यान बिर्याणी खाण्यासाठी आला. त्याच वेळी काही पळत ठेवलेल्या हल्लेखोरांनी हाजीवर गोळीबार सुरू केला. हा प्रकार बघता रेस्टॉरंट मधील सर्वांनी पळ काढला. हाजीला 5 गोळ्या लागल्यानंतर हल्लेखोरांनी हाजीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला. घटना पोलिसांना कळताचा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्याला जिल्हासामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
