Top News

ट्विंकल इंग्लिश स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा सामूहिक रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा...

समिधा सेवा संस्था नागभीड द्वारे संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा  ट्विंकल इंग्लिश स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा सामूहिक रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा...


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी सर्व धर्माचे सर्व पारंपारिक सण शाळेतर्फे साजरे केले जातात. - अजय काबरा, सचिव समिधा सेवा संस्था.



नागभीड :: समिधा सेवा संस्था नागभीड द्वारे संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा  ट्विंकल इंग्लिश स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जन्माष्टमी व गोकुळकाल्याचा कार्यक्रम मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव अजय काबरा , प्रमुख पाहुणे म्हणुन स्थानिक ब्राम्हकुमारी केंद्राच्या संचालिका मेघा दीदी, वनदेवी दीदि या उपस्थित होत्या . यावेळी  मंचावर प्राचार्या शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारणवरे, सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा नवखरे या होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवात झाली.


या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपूर्ण वातावरणात श्रीकृष्ण, राधा ची वेशभूषा साकारली .  यात रैम्प वॉक, फॅन्सी ड्रेस, भजन, प्रशन मंजुषा, भाषणे, संस्कृतीक गीत, सांस्कृतिक नृत्य विद्यार्थ्यांनी साजरी केली. त्याच बरोबर स्कुल च्या प्रांगणात महाविद्यालयिन विद्यार्थ्यांनी दही हंडी फोडली , यात रेड हाऊस, येलो हाऊस, ब्लु हाऊस, ग्रीन हाऊस बॉईझ ने  दही हंडी फोडत गाण्याचा तालावर सर्वांनी आनंद साजरा केला.

 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी सर्व धर्माचे सर्व पारंपारिक सण शाळेतर्फे साजरे केले जातात अशी माहिती संस्थेचे सचिव अजय काबरा यांनी दिली.

श्रीकृष्ण जन्माष्टमी सण धूम धडाक्यात साजरा करण्यात आला.बाळ गोपाळांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.याच बरोबर सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम देखील पार पडले या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक वृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post