माता महाकालीचा आर्शीर्वाद घेऊन मनदिप रोडे यांचा प्रचाराचा शुभारंभ
शहरातील प्रमुख सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेट
बाईक रॅलीतून हजारोंच्या संख्येत युवकांसह महिला पुरुषांची लक्षणीय उपस्थिती
चंद्रपूर (चांडागड) :: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषणा केल्या नंतर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकॄत उमेदवार मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांनी चंद्रपूर वासीयांची आराध्य दैवत माता महाकालीचा मुख्य पुजेचा व देवीच्या आराधनेसाठी पवित्र मानल्या जात असलेल्या आज मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मनसे कार्यालय तुकूम येथून बाईक रॅलीतून देवी महाकालीचे दर्शन घेत चंद्रपूरच्या जनतेच्या हिताचा कल्याणाचा निश्चय घेत जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला. माता महाकाली समोर नतमस्तक होत जन आशिर्वाद मागितला. यानंतर जवळील गुरुद्वारा येथे माथा टेकवून प्रार्थना केली. यावेळी शहरातील प्रमुख रस्त्याने बाईक रॅलीने जाताना गिरनार चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिवादन केले.प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यापुढे चर्च मध्ये प्रार्थना केली. यानंतर जटपुरा गेट जवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी पवित्र दिक्षाभुमीला भेट देत अभिवादन केले. यानंतर नागपूर रोड वरील बैहेबतुल्ला शाह दर्गा येथे जाऊन चादर चढविली व नतमस्तक झाले. मनदिप रोडे यांनी प्रचाराचा शुभारंभ शहरातील सर्व धर्म पंथ समभाव जपला. चंद्रपूरच्या नवनिर्माण साठी असलेली माझी उमेदवारी हि सर्व सामान्य जनतेचा आवाज बनून विकासाची नांदी ठरणार असल्याने चंद्रपूरच्या सर्व आराध्य दैवतांच्या साक्षीने मी आज प्रचाराचा नाहीतर नवनिर्माणाचा शुभारंभ केला आहे. माझ्या सोबत चंद्रपूरची जनता ठाम पणे पाठिशी आहे. आजपर्यंत आमच्या जनतेचा विश्वासघात करण्यात आला.त्यांना विकासाचे गाजर दाखविण्यात आले. खोटे नाटे दावे केले गेले. आता यापुढे जनता सहन करणार नाही. अशी प्रतिक्रिया मनदिप रोडे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शेतकरी सेना जिल्हाध्य आनंद बावणे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, राजू बघेल, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार,जनहित सेना जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, मनविसे जिल्हापाध्य कुलदिप चांदखेडे, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, तालुका अध्यक्ष आदित्य भाके, विजू तूरक्याल, शहर सचिव सुमित करपे, राहुल मडावी, बाळा चंदनवार, किशोर मटगुलवार, वाहतूक सेना असलम खान, बंडू, संजय भडके, जफर बेग, घुगुस शहरपाध्य सुमित कोहळे, राज वर्मा, महादेव सुतार, श्रीकांत देठे,वसीम शेख,संदिप अरडे, नितीन बावणे, नितेश जांभूळकर, शुभम टिंगलवार, राकेश हनुमंते,रोशन बतकी, राम सारवा मनसे पदाधिकारी व मनसैनिक तसेच समर्थक मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.
