आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नाने मौजा - तेलीमेंढा येथे विकासकामांचे भूमिपूजन संपन्न...
विदर्भ माझा न्युज 24 - चिमूर
चिमूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि आपल्या क्षेत्रात आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विकास कामामधील आज ग्रामपंचायत म्हसली अंतर्गत येत असलेल्या मौजा तेलीमेंढा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 20 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन
सरपंच वसुधा गुरपुडे यांच्या शुभ हस्ते तसेच चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष देवानंद बावनकर,जिल्हा परिषद प्रमुख अरविंद भुते,तालुका महामंत्री सुनील शिवणकर,भाजयुमो शहर अध्यक्ष हेमंत नन्नावरे,बूथ प्रमुख आशिष कावडकर,राजेश मिसार, मंजुषाताई डहारे ,संतोष पिसे, विनोद हुकरे,रोशनी कुमले, राजू मसराम,लुकाराम कावडकर, तुळशीदास कावडकर आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

