होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल हिवरखेड येथे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
विदर्भ माझा न्युज 24 - मनोज भगत विषेश प्रतिनिधी : तेल्हारा
होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल मध्ये संत गाडगे महाराज पुण्यतिथी या दिनाच्या औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनी व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला कार्यक्रमाचे अध्यक्ष हिवरखेड गावचे पोलीस पाटील प्रकाश गावंडे यांनी प्रथम संत गाडगेबाबा यांच्या फोटो चे पूजन करून विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले व कार्यक्रमाला निरीक्षक म्हणून लाभलेले सहदेवराव भोपळे विद्यालयाचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक संतोष कुमार राऊत यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मॉडेलचे निरीक्षण करून विद्यार्थी यांचे कौतुक केले.
तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सत्यदेव गिऱ्हे दादासाहेब देशमुख,गौतम इंगळे, डॉक्टर प्रशांत इंगळे, जगन्नाथ महाकाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
सर्वांनी मुलांचे कौतुक केले त्यानंतर डॉक्टर इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले राऊत यांनी सुद्धा मुलांना चांगले मार्गदर्शन केले गाडगे महाराजांनी सांगितलेल्या दशसूत्री चे संदेश दिले. गाडगे महाराज यांच्या विज्ञान दृष्टिकोन ठेवून हा कार्यक्रम सादर करण्यातआला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मुख्याध्यापिका कल्पना सुनिल अस्वार , यांनी केले तर संचालन सोनुबाई कुऱ्हाडे यांनी केले. तसेच आभार ममता इंगळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया वालचाळे, शितल अग्रवाल, सीमा सोनवणे , शितल वानखडे , शितल रेखाते , शितल शेळके , कुमुदिनी डेंगेकर, प्रतिभा, वायकर,राजाराम इंगळे यांनी परिश्रम घेतले.

