आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते नागभीड तालुक्यातील डोंगरगांव (बुज) येथे पेटलेल्या चुली या नाट्यप्रयोगाचा उद्घाटन सोहळा संपन्न
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
दि. २३ डिसेंबर / आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते नागभीड तालुक्यातील डोंगरगांव (बुज) येथे जुनी ग्रा.पं. चौकाच्या भव्य आवारात जय बजरंग नाट्य कला मंडळाच्या सौजन्याने प्रल्हाद नाट्य रंगभूमी देसाईगंज/वडसा प्रस्तुत तीन अंकी कलाकृती संगीत - पेटलेल्या चुली या नाट्यप्रयोगाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार बंटीभाऊंनी उपस्थित रसिक प्रेक्षकांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, जय बजरंग नाट्य कला मंडळाच्या वतीने आमदार बंटी भांगडीया यांचे पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्याला
गजानन पाथोडे, जहांगीर कुरेशी, गणेश तर्वेकर, एकनाथ बोरकर, रमेश पाथोडे, अजय कोसे, संदीप गोरे, दिवाकर पाथोडे, भागवत बागडे, अनिल भेंडे, भास्कर श्रीरामे, नरेश पाथोडे, रुपेश गायकवाड, मंगेश पाथोडे, सोमेश्वर पाथोडे, अरूण हजारे, निर्मला पाथोडे, मंगला बोरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.




