चिमूर च्या क्रीडा संकुलनास मिळाला वाढीव ३५ कोटी चा निधी.
आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नाना आले यश.
विदर्भ माझा न्युज 24 - चिमूर
येथील क्रीडा संकुल चा कायापालट होऊन खेळाडू च्या गुणांना वाव मिळावा यासाठी सुसज्ज असं क्रीडा संकुल निर्माण करण्यासाठी आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नांना यश आले असून क्रीडा संकुलनास ३५ हजार कोटी रु. वाढीव निधी मंजूर झाले आहे.
चिमूर येथील क्रीडा संकुल साठी संकुलाचे रु. ३५५३.८१ लक्ष चे अंदाजपत्रक व आराखडे सादर केले असुन त्या मध्ये बहुउद्देशिय हॉल , विद्यमान इनडोअर हॉल व प्रेक्षक गॅलरीचे दुरूस्ती, चेजिंग रूम, ४०० मी सिंडर धावनपथ, फूटबॉल मैदान, ड्रेनेज सिस्टीम, अंतर्गत रस्ते, विविध खेळाची मैदाने, बास्केटबॉल सिंथेटिक कोर्ट, होस्टेल बिल्डींग, विद्युतीकरण, क्रीडा साहित्य, पाणी व्यवस्था, बोअरवेल, पंप, फर्निचर व इ. रु. ३५५३.८१ लक्षचे अंदाजपत्रक सादर केले आहे.
४०० मी सिंडर धावनपथ, फूटबॉल मैदान, विविध खेळाची मैदाने, प्रसाधनगृह या कामांचा प्राधान्यक्रमात समावेश करण्यात यावा. यापूर्वी दिलेली सुधारीत मान्यता रू. ५२०.९७ लक्ष रद्द करण्यात आली असून नवीन नवीन सुधारित ३५५३.८१ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे
आमदार बंटी भांगडीया यांनी चिमूर येथील क्रीडा संकुल चा कायापालट करण्यासाठी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याने ३५ कोटी चा वाढीव निधी मंजूर झाला आहे.
