Top News

KCR फॅमिलीचा कालेश्वरम प्रकल्प म्हणजे ATM, राहुल गांधींची टीका......

KCR फॅमिलीचा कालेश्वरम प्रकल्प म्हणजे  ATM, राहुल गांधींचे टीका....


मेडीगड्डा धरणाला भेट


विदर्भ माझा न्युज 24 - सिरोंचा

महाराष्ट्र तेलंगणा सिमेवर तयार करण्यात आलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्या कुटुंबियांचे ‘एटीएम’ असून यात हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. आज गुरुवारी त्यांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणाला भेट देत भेगा पडलेल्या भागाची पाहणी केली.यावेळी आंबटपल्ली गावात झालेल्या सभेत त्यांनी हे आरोप केले.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकल्पात एक लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला.



 


Previous Post Next Post