वारकरी साहित्य परिषद चंद्रपूर जिल्ह्याची सभा प्रकाश पाटील मारकवार यांच्या अध्यक्षतेखाली मुल येथे संपन्न
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
दिनांक २३/१०/२०२३ रोज सोमवारला वारकरी साहित्य परिषद चंद्रपूर जिल्ह्याची सभा मुल येथील मारकवार कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार हे उपस्थित होते. सभेचे मार्गदर्शक नत्थुराव आरेकर हे होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वारकरी साहित्य परिषदेचे गठण करावे असे आवाहन प्रकाश पाटील मारकवार यांनी केले.या वेळी वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा स्तरीय कार्यक्रम १७ नोव्हे. ला मुल येथे घेण्याचे ठरले. सभेला सुखदेव वाढई, परशुराम पाल महाराज, दादाजी संदोकार, अजिंक्य प्रकाश पाटील, नवनीत चिंचोलकर, विनायक झरकर, चरणदास पोटे, दिनकर झरकर, संतोष गुडलावार, प्रभाकर पोटे, संतोष चौधरी, संतोष शुद्धलवार, शैलेश राऊत, गणपत वाकुडकर, नानाजी रोहणकर , रवींद्र शेरकी, घनश्याम कडूकार, अनिल कडुकार, विशाल क डूकर, प्रकाश क डूकार , अमोल बावणे, अर्जुन जिवतोडे इत्यादी प्रमुख वारकरी बांधव उपस्थित होते.

