Top News

Breaking news_आग लागून शेतामधिल कोठा जळून खाक..... कोठ्यामधील पाच बकऱ्या, कोंबडे,शेती उपयोगी साहीत्य जळून राख.......

Breaking news_आग लागून शेतामधिल कोठा जळून खाक.....

कोठ्यामधील पाच बकऱ्या, कोंबडे,शेती उपयोगी साहीत्य जळून राख.....शेतकर्याचे मोठे नुकसान.....



विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


कोरपणा तालुक्यातील निमणी येथील नामदेव पाटील ढवस निमणी यांच्या शेतात असलेल्या कोठ्याला सायंकाळी  ६:०० वाजताच्या सुमारास  अचानक  आग लागून  शेतामधील कोठा पूर्णपणे जळून खाक झाला.

 


आगीवर पूर्णपणे नियंत्रण करेपर्यंत सगळं जळून खाक झालेलं होतं सदर आगीत कोठ्यामध्ये असलेल्या पाच नग बकऱ्या कोंबडे शेती उपयोगी साहीत्य तसेच रासायनिक खत पूर्णपणे जळून खाक झाले. 



आग विजवायला शेता लगत असलेली लोक धावून आली. पण येतपर्यंत सगळं जळून खाक झालेलं होतं. आग कशी  लागली याचे कारण अध्यापही कळु शकले नाही. 


 सदर घटनेत  शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. यावेळी भिवसन धवस ,नामदेव धवस,सत्यपाल टेकाम ,डोमेश्वर लोहे,दिनेश टेकाम,ज्ञानेश्वर सुरतेकर,अमित लोहे ,श्रीनिवास घटे,अरुण लोहे ,पंढरी लोहे,इत्यादी उपस्थित होते. सदर नागरीकांनीच आग विजवीन्यास मदत कार्य केले व शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी उपस्थीत असणाऱ्यांनी केली.

Previous Post Next Post