Top News

Selection of science play of Mahatma Gandhi Vidyalaya Sonurli for Nagpur section

महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली च्या विज्ञान नाटकाची नागपूर विभागासाठी निवड




विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना ग्रामीण प्रतिनिधी दिपक चिवाने 9096181496

नेहरू विज्ञान केंद्र वरळी, मुंबई आणी शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेचे आयोजन 27 सप्टेंबर 2023 रोजी रफी अहमद किदवाई हायस्कूल चंद्रपूर येथे करण्यात आले. मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावरील नाट्य स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील शाळांनी भाग घेतला. त्यापैकी महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली  ता. कोरपणा या शाळेने चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकवीला. या शाळेची नागपूर विभागासाठी निवड झालेली आहे.            

यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका कुरेशी यांचे गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे अध्यक्ष  सुभाष धोटे, सचिव. धनंजय गोरे, शाळा समिती अध्यक्ष विठ्ठलरावं थिपे, सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक हनुमंते, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post