Top News

Roaring of wild animals....Farmers are worried. Farmers protest march to forest department office

वन्य प्राण्यांचा धुडगुस....शेतकरी चिंतेत।


शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा वन विभाग कार्यालयावर




विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी



आर्णी तालुक्यातील दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या सावळी सदोबा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर शेतकऱ्यांचा दबंग आक्रोश मोर्चा पहिले शेतकरी सुलतानी अस्मानी संकटात पिचलेल्या असतांना शेतकऱ्यांना वन्य प्राणी होत्याचे नव्हते करुन सोडत आहे. कापुस सोयाबीन चवळी वांगे पीक जोमात आले असतांना सर्व पिक वन्य प्राणी फस्त  करुन  शेतकऱ्यांचा स्वप्नाची राख रांगोळी करत आहे. एक तर शासन वन्य प्राण्याला मारण्याची परमिशन सुद्धा देत नाही प्राण्यांना इजा झाली तर शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल  केला जाते नेमका शेतकऱ्यांना जगायचं की मरायचं असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकतोय मरमर करत जवळची तुटपुंजी रक्कम खतम झाली  वन्य प्राण्याने वैतागलेल्या सावळी सर्कल मधील शेतकऱ्यांनी  विराट  मोर्चा  धडकला वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचा  मोक्का पाहणी करताना कृषी अधिकारी तलाठी सचिव हे असायला हवे पण ती आट रद्द करण्यात यावी जंगली प्राण्यांनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे जंगलातील कंपाउंड ला जाळी करण्यात यावी व ईरत शेतकऱ्यांच्या समस्येचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी सावळी सदोबा यांना देण्यात आले. शेतकऱ्यांचे निवेदन त्वरित वरिष्ठानकडे सोपवुन शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेतल्या जाईल अशी आश्वासन देण्यात आली आहे. 

Previous Post Next Post