Top News

On the occasion of World Senior Citizens Day, a felicitation program for senior citizens was concluded at Balharshah.

बल्हारशाह येथे जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम संपन्न ।



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चे कल्याण आयुक्त मुंबई रविराज ईळवे  व विभागीय कार्यालया चे सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूर नंदलाल राठोड व चंद्रपूर गट कार्यालय चे कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे  यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार कल्याण केंद्र, बल्हारशाह येथे दिनांक.१आक्टोंबर २०२३ रोजी जागतिक - जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष प्रीतम नामदेव पाटील ज्येष्ठ नागरिक प्रमुख पाहुणे ॲड. आय.आर.सय्यद, नीलकंठ गायकवाड हे होते.

सत्कार मूर्ती -  १) उत्तम करणुजी शेंडे  २) शिवराम दिवाजी सरोदे ३) नीलकंठ गायकवाड ४) श्रीमती शकुंतला पांदीलवार ५) मो.आरिफ मो. शरीफ सिद्दीकी या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  रामेश्वर अळणे, कामगार कल्याण अधिकारी यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश इटनकर, केंद्र संचालक  यांनी व आभार प्रदर्शन केंद्र महिला कल्याण सहायिका सविता वरखेडकर यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्योती दमोधरे व सुरक्षा रक्षक करण थुल यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post Next Post