बल्हारशाह शहरातील शुभम लक्केवारला लंडनची शिष्यवृत्ती।
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळवायची असेल तर जिद्दी आणी चिकाटीला पर्यायच नसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहरातील महाराणा प्रताप वार्डातील शुभम किशोर लक्केवार या विद्यार्थ्याने हे सिद्ध करून दाखविले आहे.
त्याला इंग्लंडच्या इडनबर्ग विद्यापीठात इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंग शाखेत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे.
शुभम लक्केवार या विद्यार्थ्याची उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याची धडपड सुरु होती. अखेर त्याची इच्छा पूर्ण झाली शुभमने दिलसाग्राम काॅन्व्हेंटमध्ये 10वी, गुरुनानक सायंन्स कॉलेजमध्ये 12वी आणि संत बिनसेंट पलौती इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर येथून शिक्षण पूर्ण केले. त्याला विदेशात उच्च शिक्षणाला जाण्यासाठी हेमंत सुटे व मारोतराव साव यांचे मार्गदर्शन लाभले, शुभमचे वडील किशोर लक्केवार हे वेकोलि येथील सेवानिवृत कर्मचारी, तर आई रत्नाबाई गृहिणी आहे. शुभमची परदेशात शिकण्याची इच्छा पुर्ण झाल्यामुळे कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
