Top News

Balharshah police arrested two thieves who broke into a house in broad daylight in Balharshah and looted valuables worth 13 lakhs from Nagpur.

बल्हारशाह शहरात भरदिवसा घर फोडी करून १३ लाखांचा मुद्देमाल लंपास करणार्या दोन चोरट्यांना नागपुरातून बल्हारशाह पोलिसांनी केली अटक.....




विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

बल्हारशाह शहरातील राजेंद्र प्रसाद वॉर्डात भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह १३ लाख २० हजारांचा मुद्देमाल लांबविला होता. बल्हारशाह पोलिसांनी मोठ्या शिताफीने सीसीटीव्हीच्या साहाय्याने नागपुरातून दोन अट्टल गुन्हेगारांना मंगळवारी रात्री अटक केली. राजेंद्र उर्फ राजहंस दुर्गाजी भेदे (३० रा. शंकरपूर बोरखेडी) संतोष उर्फ मोनू गौतम निकोसे (३५ रा.रामबाग नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

 राजेंद्र प्रसाद वॉर्डात शिवम वाघमारे यांचे घर आहे.कामानिमित्त त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह १३ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरून पसार झाले. वाघमारे यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू करण्यात आला.

 वाघमारे यांच्या घराचा पंचनामा करत असताना पोलिसांना घटनास्थळी एक पेचकस आढळला. हा पेचकस नागपूर येथून अटक केलेले आरोपी बल्हारशाह रेल्वे चौकातील दुकानातून विकत घेतल्याचा अंदाज पोलिसांना आला. 

त्यावरून संबंधित दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटे एका वाहनातून नागपूरला पसार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, दिलीप आदे, संतोष दंडेवार आदींचे पथक नागपुरात रवाना झाले. तेथून आरोपी राजेंद्र उर्फ राजहंस भेदे आणि संतोष उर्फ मोनू निकोसे या अट्टल गुन्हेगारांना अटक केली. या आरोपींवर वरोरा वर्धा, नागपूर, सोनेगाव हुडकेश्वर, गोंदिया, भंडारा येथे गुन्हे दाखल आहेत.


Previous Post Next Post