बल्हारशाह येथील विसापुर टोल नाक्याजवळ सुगंधीत तंबाखुने भरलेले दोन ट्रक जप्त ।
नागपूर व अमरावती येथील अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाने स्थानिक पोलिसांना सोबत घेत ते 2 ट्रक पकडले..
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हरशाह
वादर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात बल्हारशाह येथे तंबाखूयुक्त पदार्थ जप्त करण्यात अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर व अमरावतीच्या दक्षता पथकाने चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त कारवाई ला यश मिळाले आहे. वर्ष 2012 पासून राज्यात सुगंधित तंबाखूजन्य पदार्थावर प्रतिबंध लावण्यात आला होता, मात्र त्यानंतर चंद्रपूर व इतर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची विक्री खुलेआम होत आहे.
19 सप्टेंबरला राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असताना 2 ट्रक सागर पान मसाल्याचा तब्बल कोट्यवधी रुपयांचा माल घेऊन निघाले होते, मात्र याची माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील एकाही विभागाला मिळाली नाही, पण नागपूर व अमरावती येथील अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाने स्थानिक पोलिसांना सोबत घेत ते 2 ट्रक पकडले.
पान मसाला असलेले सुगंधित तंबाखूने आजची तरुणपिढी नशेच्या आहारी जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी आजची तरुण पिढी आपल्या शरीरात असाध्य कॅन्सरसारखे घातक आजार घेऊन मृत्यूच्या खाईत जात आहे. तंबाखूजन्य पदार्थ विकणारे व्यापारी आता करोडपती होत आहे. स्थानिक प्रशासन हे करोडपतींचे बाहुले बनली आहे? येथून खुलेआम दररोज जाणारे ट्रक कोणी का थांबवले नाही?
स्थानिक प्रशासनाच्या कारभाराचा पर्दाफाश करणारी घटना म्हणजे बाहेरून जिल्ह्यात आलेल्या दक्षता विभागाच्या पथकाने बल्हारशाह येथे सुगंधित सागर पान मसाला भरलेले ट्रक पकडण्याची कारवाई केली आहे.
ट्रक क्रमांक TS 07 UE 7206 आणि MH 25 U 1211 क्रमांकाचा ट्रक विसापूर टोल नाक्याजवळ सायंकाळी 5 वाजता पकडल्या गेल्या, वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 1 कोटी 11 लाख रुपयांचा सागर पान मसाल्याचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणात 2 ट्रक चालक व वाहक अश्या 4 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली असून सदर माल हा कर्नाटक राज्यातील बिदर मधून मध्यप्रदेश राज्यात नेत असल्याची माहिती समोर आली असुन. याबाबत बल्हारशाह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कारवाई अन्न व औषध विभागाकडे देण्यात आली असून प्रकरणाचा तपास बल्हारशाह पोलीस करीत आहे.
